
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
हदगाव ता.प्र.विकास राठोड यांचे कडून)
हदगाव तालुक्यासह या वर्षी संपुर्ण मराठवाड्यात “न भुतो न भाविष्यती” अशी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला होता.सोयाबीन सह अनेक पिकांचा शेतकऱ्यांनी पिक विमा काढला .ईफको टोकीयो कंपनीने शेतकऱ्यांकडुन विमा हप्ता पुर्ण घेतला ,त्या अर्थी पुर्ण नुकसान झाल्यास विमाही पुर्णच देणे बंधन कारक असतांना नदिकाठच्या शेतकऱ्यांना हेक्टरी अंदाजित 13000/- तर बाकी शेतकऱ्यांना अंदाजीत 5000/- येवढी तुटपुंजी विमा रक्कम खात्यात जमा करुन शेतकऱ्यांची बोळवन केली.100% नुकसान तर 100 भरपाई ही दिलीच पाहीजे हा शेतकऱ्याचा अधिकार आहे.पण झोपेचे सोंग घेतलेले सरकार,व विमा कंपनिच्या इशाऱ्यावर काम करणारे प्रशासन विमा कंपन्यांच्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम अदा करीत आहे.
सदरील देय विमा रक्कम मान्य नसल्यामुळे हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील शेतकरी बालाजी घडबळे व त्यांची पत्नी सौ.वर्षा बालाजी घडबळे यांनी तहसिलदार हदगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे कळवले की आमच्या पिकाचे नुकसान 90% पेक्षा जास्त झाले असुन आम्हाला विमा रक्कम 90% पेक्षा जास्तच देण्यात यावी .कारण 72 तासाच्या आत कंपनिला कळवुनही विमा कंपनी पंचनामा करीत नसल्यास त्यास शेतकरी दोषी नसुन विमा कंपनी दोषी आहे.विमा कंपनीला सर्व सर्वे करणे अडचणीचे झाले असेल तर ही अडचण विमा कंपनीची आहे.त्यामुळे विमा कंपनीने पुर्ण विमा रक्कम द्यावी अशी मागणी केली असुन,जर 13 डीसेंबर पर्यत खात्यात विमा रक्कम जमा न झाल्यास आम्ही दोघेही नाविलाजास्तव आत्मदहन करणार असुन घडलेल्या प्रकाराला संबधीत प्रशासन व इफको टोकीयो कंपनी जिम्मेदार असेल असे निवेदनात म्हटले आहे.
विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहन करण्याची वेळ यावी ही बाब अत्यंत निंदनिय असल्याचे बोलल्या जात आहे.
