

प्रतिनिधी:लता फाळके,हदगाव
काल दि. 31 डिसेंबर 2020 म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी करमोडी येथील कॉग्रेस पक्षाचे सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सुनील आनेराव ,सुभाष पचलिंगे,विट्टल धरमुरे,शिवा पाटील, रामचंद्र आमदरे,तातगत वाघमारे, यांनी मा. आ. नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा. आ.नागेश पाटील यांच्या आमदारकी च्या कार्यकाळात भरपूर विकास कामे झाली. परंतु ‘घर का भेदी लंका ढाए’ या उक्तीप्रमाणे नागेश पाटील यांचा जवळ च्या लोकांकडून विश्वास घात झाला. जनता चुकीच्या भावनिक प्रचाराची बळी ठरली हे जनतेच्या आता सर्व काही लक्षात येत आहे. म्हणुन आता मतदार संघातील जनता नागेश पाटील यांच्या नेतृत्वात प्रवेश करीत आहेत. काल करमोडी येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यावेळी उपस्थित बंडू पाटील मिरासे तालगंकर ( प. स. सदस्य ),धनंजय मिरासे,गजानन पतंगे इत्यादी उपस्थित होते.
याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, यापुढे सुद्धा खूप मोठया प्रमाणात शिवसेना प्रवेश होणार आहेत. व आमचे सरकार असल्यामुळे मी त्या माध्यमातुन अधिक वेगाने विकास कामे करण्याच्या निर्धार केला आहे.
आगामी वर्षात 2021 हदगाव-हिमायतनगर मतदार संघातील माझ्या सर्व शिवसेना कार्यकर्त्यांना हे नवीन वर्ष निरोगी आणि सुख-समृद्धी व भरभराटीचे येवो. प्रत्येकाला निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. मा. आ. नागेश पाटील 👏🏻💐💐
