
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव
हदगाव तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी बालाजी पाटील उंचाडकर यांचे पुतणे चिंरजीव रुद्रा उर्फ हर्षवर्धन यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दीतीने करून खर्चाची बचत करुन व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून काल मनाठा पोलिस स्टेशन येथे अकरा वृक्ष भेट देवून वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी एपीआय विनोद चव्हाण साहेब,धनाजी मारकवाड साहेब,पवार साहेब,बालाजी पाटील,शिवाजी पंतगे,पांडूरंग शिंदे,बालाजी चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण, करुन समाजात नाविन्यपुर्ण उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
