
लता फाळके /हदगाव
हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागील चार – पाच दिवसापासुन सतत मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे तालुक्यातील संपूर्ण शेतीचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. आधीच दुबार- तीबार पेरणी करून, अव्वाच्या सव्वा बियाणे- खते घेवून शेतकरी हैराण असताना आता हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे डोळ्यासमोर पाण्यात गेला. या निसर्गाच्या संकटामुळे बळीराजा पूर्णतः कोलमडून गेलेला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ दखल घेवून शेतकर्यांना आर्थिक मदत करावी व पीकविमा कंपनी ने सरसकट पीकविमा द्यावा यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी तहसीलदार ना निवेदन दिले त्यावेळी तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी आत्माराम जाधव वाटेगावकर, नागोराव सूर्यवंशी हरडफकर, विद्यानंद जाधव इत्यादी सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
