त्रिमूर्ती पॉलीक्लिनीक,वित्तनगर, तरोडा(बु),नांदेड येथे मोफत सुवर्ण प्राशन शिबीर…

लता फाळके / हदगाव

दि 01/01/2021 शुक्रवार रोजी गुरूपुष्यमृतयोग निमित्ताने त्रिमूर्ती पॉलीक्लिनीक,पाटील निवास (B-57),वित्तनगर, नांदेड येथे सकाळी 8 ते सायं 7 या वेळेत 0 ते 13 वर्ष वयोगटातील लहान बालकांसाठी मोफत सुवर्ण प्राशन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मध्ये बालकांची आरोग्य तपासणी व सुवर्ण प्राशन संस्कार पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
कोरोना व ईतर साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जबाबदार पालकांनी आपल्या लहान मुला,मुलींना सुवर्ण प्राशन संस्कार करून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करावी व या मोफत सुवर्ण प्राशन शिबिराचा जास्तीत जास्त बालकांनी लाभ घ्यावा असे अवाहन शिबीराचे आयोजक डॉ गंगाधर घुटे यांनी केले आहे.