अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

लता फाळके /हदगाव



हदगाव येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदरणीय अ‍ॅड . बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10/05/2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी हदगाव तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी,माजी पदाधिकारी कार्यकर्ते,महिला आघाडी, शहरआघाडी,युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वानी सहभाग घेवून सहकार्य करावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष इंजी.प्रशांत इंगोले,
दीप प्रज्वलन मा.दादासाहेब शेळके(भिम टायगर सेनासंस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र.),
प्रमुख उपस्थिती श्री.जिवराज डापकर साहेब (तहसीलदार उप-विभागीय अधिकारी,हदगाव),
श्री.लक्ष्मण राख साहेब,(पोलिस निरीक्षक,हदगाव) या सर्व मान्यवरांच्या हस्ते रक्त दान शिबिराला सुरुवात होणार असल्याचे देवानंद पाईकराव
(वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुकाध्यक्ष) यांनी सांगितले.