
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण रद्द निर्णयच्या अनुषंगाने आज हदगाव येथील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करून हदगाव तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षण खटला न्यायालयात असताना राज्य सरकारने व केंद्र सरकारने संबंधित विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे आज मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे.
या निर्णयास महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यकर्ते, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार आहे या दोन्ही सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात केला अशा आश्याचे निवेदन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने हदगाव तहसील कार्यालय येथे देण्यात आले. या मराठा समाजाच्या लढ्यास नाना भाऊ पटोले युवा मंच चे तालुका अध्यक्ष गजानन दळवी यांनी पाठिंबा दिला.
निवेदन देताना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संयोजक (अ. आ.) तथा विदर्भ संपर्क प्रमुख शिवाजी जाधव हरडफकर नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी कर्हाळे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संदीप आढाव हदगाव तालुका कार्याध्यक्ष विश्वजीत पवार हदगाव तालुका उपाध्यक्ष गजानन सोळंके मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष साईनाथ सूर्यवंशी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन पाटील मोरे. पमु पा.वाळकीकर. सुरेश पाटील. सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शंकर पाटील एम जे पाटील. अमोल पाटील कदम. अमोल वानखेडे. आकाश गोदले. माधव वानखेडे. देवानंद पा. ता. सं. ता. सरचिटणीस गजानन पाटील कोल्हे.हदगाव शहराध्यक्ष अक्षय भाऊ. रुई सर्कल अध्यक्ष संदीप गिरी. कृष्णा पाटील व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
