
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार मागणी करून देखील नगरपालिकेच्या वतीने कोणत्याच मागण्या पूर्ण केले नसल्यानेअखेर मनसेच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी भर पाऊसात बोंब मारो आंदोलन करत नगरपालिकेला घेराव घातला व मागण्या का मान्य केल्या नाही म्हणुन मुख्याधिकारी दामोदर जाधव यांना प्रश्न विचारल्या चे चित्र दिसून आले.
सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हदगाव नगरपरिषदेवर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. मनसेच्या वतीने शहरातील विविध मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा यापुढील आंदोलन हे उग्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.
1) आझाद चौक ते राठी चौक रोडच्या दोन्ही बाजूने नालीत साफ करून पाणी निचरा करणे.
2) हदगाव शहरातील पूर्ण कचरा उचलण्यासाठी दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून 10.00लक्ष रुपये दंड वसूल करावा.
3) हदगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजक का वर झाडे लावुन सुशोभिकरण करण्यात यावे.
4) हदगाव शहरातील घरासमोरून घणकचरा उचलण्यासाठी नगर परिषदेने दोन दिवस आड करून घंटागाडी पाठविण्याची व्यवस्था करावी.
5) हदगाव शहरातील ग्रीन पार्क कॉलनी येथे गेल्या 15 वर्षापासून नगरपरिषदेने कुठलीच सुविधा दिली नाही त्यामुळे या परिसरात सर्व नगरपालिकेच्या सुविधा पुरविण्यात याव्यात.
6)वार्ड क्र. 9मधील शासकीय महिला शौचालय याची दुरुस्ती करून त्या मोकळ्या जागेमध्ये वॉल कंपाऊंड करून आत मध्ये झाडे लावण्यात यावी.
7) आठवडी बाजार ज्या ठेकेदाराने घेतला आहे तो ठेकेदार दुकानदारांना जास्तीचे पैसे घेऊन पावती देत नाही ठेकेदाराला ठरलेले टेक्स घेण्यास सांगून त्यांना पैसे घेतले याची पावती देण्याची सक्ती करावी.
8)वार्ड क्र. 11 मधील कुरेशी मोहल्ला जिनिंग करून येणारा मोठा नाला याची गेली पंधरा वर्षे साफ सफाई झाली नाही त्यामधील गाळ काढून त्यावर स्लॅब टाकून अंडरग्राउंड करावे तसेच या नाल्याचे ठिकाणी बरेच लोक राहत आहेत त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
9) हदगाव शहरातील वार्ड नंबर 16 व 17 मधील नाल्या रस्ते पथदिवे तात्काळ करण्यात यावी.
10) शहरातील फिल्टर प्लांट चे काम 10 वर्षापासून चालू आहे ते त्वरित पूर्ण करून लोकांना त्याचा फायदा देण्यात यावा.
तरी वरील प्रमाणे आमच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अन्यथा पुढील आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे पण निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे, मनसेचे पंजाब भाऊ तालंगकर,शैलेश शिरफुले शहराध्यक्ष, राम ससाणे तालुकाध्यक्ष अनुसूचित जम-जाती,आराध्य पाटील बाभळीकर ता.उपाध्यक्ष,आमोल ससाणे,बंट्टी शाहानेराव, राज खंदारे,चांँद ससाणे,विधवान पाईकराव, दिनेश जाधव,सुरज आडे, कचरु ससाणे,नारायण बेलखेडे, दिलशान अवटे,क्रांतीकुमारआगळे,वैभव कदम,रमेश प्रल्हादराव कदम अनिल सुभाष राव कदम सोपान कैलासराव कदम माणिक रामचंद्र कदम महेश दत्तराव कदम बाबुराव कदम,सुरज जयवंतराव कदम विष्णु भगवान शिंदे कृष्णा भगवान शिंदे रोहन संजय कदम आशिष बापुराव कदम योगेश अरविंद कदम वैभव दादाराव कदम आकाश रामदास कदम
आबाराव कोंडबाराव कदम फळीकर,आकाश कदम, अक्षय हिवरकर,अविनाश देशमाने,सुनिल काळे मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.
