पत्रकार प्रेस परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रभारी पदी अरविंद जाधव पाटील यांची चौथ्यांदा निवड

लता फाळके /हदगाव

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संपूर्ण भारत देशामध्ये असणारी क्रियाशील संघटना म्हणून पत्रकार प्रेस परिषद भारत या संघटनेचे नाव अव्वलस्थानी आहे, या संघटनेच्या प्रदेश प्रभारी पदी सुदर्शन टीव्ही चॅनल चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी तथा तेजपुंज न्यूज चे मुख्य संपादक अरविंद जाधव पाटील यांची सलग चौथ्यांदा निवड पत्रकार प्रेस परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नई दिल्ली येथे करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान बाबा कृष्णदेव मिश्रा, राष्ट्रीय सचिव वृषभ मिश्रा आझाद, केंद्रीय कार्यालय दिल्ली प्रभारी सत्य प्रकाश सिंह, महेंद्र प्रसाद जी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अरविंद जाधव पाटील यांच्या नावाची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. अरविंद जाधव पाटील यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा असतो ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जागतिक महिला दिन, भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आधी राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान महिला, कर्तबगार अधिकारी, पोलीस प्रशासनातले कर्तबगार पोलीस अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, कृषी क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती अशा विविध क्षेत्रातील क्रियाशील व्यक्तीचा पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव करून त्यांना दरवर्षी सन्मानित केले जाते, या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील कुसुमताई चव्हाण सभागृहामध्ये दरवर्षी केल्या जातो तसेच अनेक जिल्ह्यातील पत्रकारांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत असते तिथे त्यांच्या मदतीसाठी तात्काळ धावून जाऊन त्यांना जमेल त्या पद्धतीने मदत करून न्याय देण्याचे काम पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले परिषदेचे पदाधिकारी करीत असतात या सर्व कार्याची दखल घेऊन व दरवर्षीचा लेखाजोगा केंद्रीय कार्यकारिणीने मागून घेतल्या नंतर अरविंद जाधव यांचे नाव महाराष्ट्र राज्यातून अव्वलस्थानी असल्यामुळे त्यांना चौथ्यांदा पत्रकार परिषदेच्या महाराष्ट्र प्रभारीपदी निवड करून त्यांच्यावर पुन्हा एकदा राज्याची जबाबदारी टाकली आहे. पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाबा कृष्णदेव मिश्रा, पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय सचिव वृषभ मिश्रा आजाद , दिल्ली प्रदेश कार्यालयाचे प्रभारी सत्य प्रकाश सिंहयांनी पुन्हा एकदा अरविंद जाधव यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यार अभिनंदन नाचा वर्षाव होत आहे.