

लता फाळके/ हदगाव
तालुक्यातील शिरड या गावी शिवसैनिक वैजनाथ कल्याणकर यांनी त्यांचे चिरंजीव विराज कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा शिरड येथे प्रत्येक वर्गासाठी थंड पाण्याचे कुलझार भेट दिले. सध्या कोरोना या रोगाच्या प्रार्दुभाव असल्यामुळे कोरोना चा संसर्ग लक्षात घेऊन वाढदिवस अतिशय साधेपणाने घरगुती साजरा करून त्या पैशातून शाळेला कुलझार भेट दिल्यामुळे सर्वस्तरातून वैजनाथ कल्याणकर यांचे कौतुक होत आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच शरद चौरे, उपसरपंच बालाजी कलाने, माजी सरपंच संजय कल्याणकर, माजी सरपंच अनिल पाटील, बालाजी ठाकरे, सचिन सुकळकर व शाळेचे शिक्षक केंद्रे सर व इतर मंडळी उपस्थित होती.
