इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सुरू करा, संस्था चालकाची मागणी

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी


आज रोजी हादगाव तालुक्यातील संस्थाचालकांनी माननीय तहसीलदार हादगाव यांना निवेदन देऊन इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास परवानगी मागितली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर आहेत. त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची परवानगी परवानगी द्यावी आणि त्याचे कारणे सुद्धा त्यांनी या निवेदनामध्ये दिलेले दिसतात. विद्यार्थी शाळेसाठी उभारण्याचा 8-10 लाखाचा खर्च. स्कूल बस साठी लाखो रुपये खर्च करून या सर्व फायनान्स चे हप्ते आम्ही कसे फेडणार हप्ता नाही भरला तर फायनान्स वाले व्याजावर व्याज आकारत आहेत आणि आमचा सिव्हिल खराब होत आहे. आम्ही या निवेदनाद्वारे आपणास कळवितो की संबंधित पालकाचे संमती पत्र घेऊन कोरूना चे सर्व नियम पाळून आम्हा खाजगी संस्थाचालकांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. नाहीतर आम्हास संस्था तालुका शाळेवर असलेल्या शिक्षकासाठी आणि बसेसची फायनान्स भरण्यासाठी आपण योग्य ते वेतन किंवा अनुदान द्यावे.
आपण यातून काहीतरी पर्याय सुचवावा कारण खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडल्या तर बाकी सर्व विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना नियमित मासिक वेतन मिळत आहे त्याचप्रमाणे आमचाही विचार करण्यात यावा कारण या कोरोना महामारी मुळे संस्थाचालक आवर शिक्षक स्टाफ वर आणि ड्रायव्हर णि इतर कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.बऱ्याच लोकांचे एकट्या वर संसार उभे आहेत त्यासाठी सर्वांना मदत करून आपण योग्य तो विचार करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर खासगी संस्थाचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत