
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हिमायतनगर कोरोणा संसर्गजन्य महामारीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील जनतेनी घाबरून न जाता जागरूक पणे शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करावे आणि ग्रामीण रुग्णालयात कोरोणा प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोणा प्रतिबंधक लसीकरणाला प्रतीसाद देवून ही लस घेवून ह्या राष्ट्रीय कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डि. डी. गायकवाड यांनी केले.
हिमायतनगर येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत चारचाकी वाहनावर ध्वनी क्षेपनं यंत्राच्या साह्य़ाने जनजागृती अभियान, मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना डाॅ. गायकवाड म्हणाले की, कोरोणा महामारीला रोखण्यासाठी, शासन,प्रशासन स्तरावर जोराचे प्रयत्न चालू आहेत. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप अथवा इतर सर्व आजारासाठी घाबरून न जाता,आपल्या जवळील डॉकटर कडे जाऊन योग्य ते उपचार घ्यावा. ताप, सर्दी, खोकला आदि लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोणा चाचणी करून घ्यावी. रिपोर्ट निगेटिव्ह निघाला तर ठीक, परंतू पॉझिटीव्ह रीपोर्ट आला तरी घाबरून न जाता योग्य ते उपचार घ्यावेत. हिंमतीने आलेल्या संकटावर मात करावी. कोरोणा प्रतिबंधक लस सुरक्षीत आहे. सर्वानी कोरोणा प्रतिबंधक लस घेवून या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवून सुरक्षीत जिवन जगावे. अतिशय गरजेनुसार घराबाहेर पडावे, तोंडाला मास्क बांधावा. सुरक्षीत अंतर ठेवून शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करावे. असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डि. डी. गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित पत्रकार परमेश्वर शिंदे, व्यंकटी गंधम, संदीप भाऊ सह अडी जन होते
