हिमायतनगर नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कार्य करा:- जिल्हाप्रमुख कोकाट

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर

हिमायतनगर प्रतिनिधी
शहरातील सार्वत्रिक नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम 2021 जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली त्यामध्ये शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या आज दिनांक 1 मार्च 2021 रोजी हिमायतनगर शहरातील बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला नांदेड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ कोकाटे यांनी शहरातील 1 ते 17 वार्डातून शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज मागून घेऊन त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज घेतला
covid-19 मुळे नियमांचे पालन करून हिमायतनगर शहरातील शिवसेना इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज दिनांक 1 मार्च रोजी शहरातील बालाजी शाळा येथे घेण्यात आला शिवसेनेची ही पहिलीच बैठक असल्यामुळे यावेळी माजी आमदार नागेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की हिमायतनगर शहरातील सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार कडून आपल्या शिवसेना पक्षाला सन्मानाने जागा दिल्या तर आपण नक्की त्यांच्या सोबत जाऊ अन्यथा आम्ही 17 च्या 17 जागी उमेदवार उभे करून हिमायतनगर नगर पंचायत च्या सर्व जागा स्वबळावर लढण्यास तयार आहोत व मागील काळात मी आमदार असताना हिमायतनगर शहरातील असंख्य कामे केली व शहरातील जनतेला 40 बोर मारून दिले व शिवसेनेचा नगराध्यक्ष कुणाल राठोड झाला तेव्हापासून हिमायतनगर शहरात 19 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली त्यासह कनकेश्वर तलाव येथील 1कोटी 75 लाख रुपयांच्या निधी च्या मंजुरीचा प्रस्ताव सुद्धा निर्विवाद मंजूर करण्यात आला व त्याचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले व नंतर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ कोकाटे यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी आज हिमायतनगर शहरात एकूण 35 इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले त्यामध्ये सोळा महिला इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला तर 19 पुरुषांनी इच्छुक उमेदवारीचे अर्ज भरले व मुलाखती दिल्या
यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता भाऊ कोकाटे साहेब, मा. परमेश्वर पंचाळ साहेब भोकर हदगाव विधानसभा समन्वयक, मा.डॉक्टर संजय पवार साहेब माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यवर्त ढोले, किसान सेना तालुका प्रमुख प्रकाशराव जाधव, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, शिवसैनिक शामराव वानखेडे, गजानन पाळज कर, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश चिल्का वार, युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड, राम नरवाडे, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सावन डाके, विठ्ठल ठाकरे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जफर ला ला, देवकते बापू, संतोष फुलेवाड, कपिल हराळे, सह पत्रकार गोविंद गोड सेलवार, अनिल भोरे, नागेश शिंदे सह आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते