हिमायतनगर शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव (अर्ज) धूळखात

हिमायतनगर प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर येथील नगरपंचायत हद्दीतील घरकुल धारकांना दुसऱ्या टप्प्यात घरकुल मिळतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे शेकडो नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी शासनाकडून मिळणाऱ्या घरकुल योजनेत प्रस्ताव दाखल केले. मात्र सत्ताधार्यांनी चालढकल करत अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. आणि जनतेच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज शेकडो लाभार्थ्यांचे दाखल केलेल्या घरकुलधारकांचे प्रस्ताव (अर्ज) मंजुरी अभावी येथील नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडले असल्याचे पाहावयास मिळले आहे.
याबाबत संबंधित कुशाग्र असोसिएशन नांदेडच्या सबंधितांना मी विचारणा केली आणि प्रत्यक्ष भेट घेऊन याचे कारण जाणून घेतले असता त्यांनी सांगितले कि, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आमच्या ५ वर्षाचा करारनामा असताना देखील एजन्सीच्या कामाला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे हे दुसऱ्या टप्प्यातील घरकुलाचे प्रस्ताव (अर्ज) धूळखात पडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या धूळखात पडलेल्या घरकुलाच्या बाबतीत मी स्वतः माजी नगराध्यक्ष असल्याने अनेक नागरिक माझाकडे घरकुलाचे विचारणा करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मी अब्दुल अखिल अब्दुल हमीद एक जबाबदार नागरिक तथा लोकप्रतिनिधी या नात्याने घरकुल प्रस्तावामध्ये लक्ष घातले आहे. खरे पाहता गरजू लोकांना लवकरात लवकर घरकुल मिळवून देऊन त्यांचे स्वप्न साकार कर्णयःची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते मात्र केवळ तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुले मिळाले नाहीत असा आरोप मी स्वतः करतो आहे.