कार्ला येथे राजे छत्रपती शहाजी राजे भोसले यांची जयंती साजरी

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवशी, हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे छत्रपती ग्रुप कारला यांच्या सौजन्याने दिनांक 18 मार्च रोजी छत्रपती शहाजी राजे भोसले यांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी ह भ प नागोराव चव्हाण माऊली महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला दरवर्षी कार्ला येथील नवतरुण छत्रपती ग्रुप च्या माध्यमातून गावात अनेक धार्मिक विविध व सामाजिक कार्यक्रम राबवतात त्यामुळे दिनांक 18 मार्च रोजी गावातील नवतरुण युवकांनी छत्रपती शहाजीराजे भोसले यांची जयंती मोठ्या आनंदात साजरी केली

यावेळी ह.भ.प.नागोराव चव्हाण माऊली,संभाजी सुर्यवंशी, माधव मिराशे, रमेश चिंतलवाड,जनार्दन मुठेवाड,मारोती सुरोशे,निरंजन मिराशे, वैभव कांबळे,अब्दुल जुनेद,चंद्रकांत गुंफलवाड,ईश्वर आचमवाड,पवण ताटेवाड,गणेश मुठेवाड,निळकंठ मोरे, ओम मोरे,राजेश यटलेवाड,शिवप्रसाद सुरशेटवाड,रामेश्वर रासमवाड, छत्रपती ग्रुप चे संयोजक, परदुम इठेवाड ( अध्यक्ष) ,अक्षय मोरे ( उपाध्यक्ष) तर यावेळी छत्रपती ग्रुप कारलाचे जांबुवंत मिराशे व अंगद सुरोशे सह आदी शिवभक्त यावेळी उपस्थित होते