
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात १० दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात आला असताना अनेकजण आपली प्रतिष्ठाने उघडून जनता कर्फ्यूच्या आदेशाला हरताळ फासत आहे. याबाबत सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रियेनंतर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि.२६ एप्रिल रोजी १० वाजता हिमायतनगर शहरात अचानक भेट दिली. आणि अनेकांचे शटर डाऊन झाले. असे पून्हा जर कायद्याचे उल्लंघन करीत असतील तर त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आज हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिले गेल्या दोन चार दिवसा पासून हिमायतनगर तालुक्यात जनता कर्फ्यु लावलेला असताना देखील काही दुकाने आपल्या काही मिळगती साठी लोकांना बेभाव सामाण विकले जावू लागले त्यामुळे जर का असे होत राहील तर येणाऱ्या काळात एक तर नागरीकाची लुट होईल व कोरोनाचे प्रमाण देखील वाढत राहील म्हणुन नागरीकानी देखील पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे असे आवाहन देखील आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आज पोलिस निरीक्षक भगवान कांबळे तहसीलदार एन डी गायकवाड त्याच बरोबर आनिल मादसवार संजय माने आदी कर्मचारी यांनी हिमायतनगर बाजार लाईनचा आढावा घेतला आहे
