बड्या आजी-माजी राजकीय नेत्यांना पत्रकारांच्या कार्याचा विसर

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर| मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दि.०६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सर्व स्तरातून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या जातात मात्र हिमायतनगर तालुक्यातील बड्या आजी-माजी राजकीय नेत्यांना पत्रकारांच्या कार्याचा जणू विसर पडल्याचे दिसून येत आहे. केवळ निवडणुकी पुरताच पत्रकारांचा उपयोग घेण्यासाठी वापर केला जातोय का..? असा प्रश्न जेष्ठ पत्रकारांना पडला आहे. त्यामुळे पत्रकारांनी राजकीय नेत्यांची केवळ प्रसिद्धी नं करता त्यांना मोठे करणं थांबविण्यासाठी एकजूट होणं गरजेचं आहे.

लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेले पत्रकार समाजातील चांगल्या वाईट घडामोडींचा आराखडा वर्तमान पात्राच्या माध्यमातून मांडत असतात. राजकीय नेत्यांच्या हालचाली व त्यांची कार्याची नेहमीच वाहवाह करत असतात. मात्र राजकीय नेते केवळ आपल्या फायद्ययापुरतातच पत्रकारांचा वापर करत असल्याचे पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करण्याचे विसरल्यावरून दिसून येते आहे. अश्यातच अपवाद ठरले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष सरदार खान यांनी तरी पत्रकारांचे कार्य लक्षात घेऊन दर्पण दिननिंमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याना पत्रकारांचा आदर व सहानुभूती असल्याचे यावरून दिसून येत आहे. किमान याची तरीं मोठ्या राजकीय नेत्यांनी घेऊन आपल्याला मोठा करणाऱ्यांच्या कृतज्ञतेची जण ठेवावी अशी रास्त अपेक्षा पत्रकार बांधवानी व्यक्त केली आहे.