हिमायतनगर शहरात श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाची शोभायात्रेने सुरुवात , जय श्री राम नामाच्या गजरात शहर दुमदुमले

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी


श्री राम जन्मभूमी निधी संकलन समितीच्या वतीने हिमायतनगर शहरात दिनांक 16 जानेवारी रोज शनिवार श्री परमेश्वर मंदिर तेथून सराफा लाईन ,बाजार चौक ते गणेश चौक, लकडोबा चौक , या मार्गे भव्य दिव्य अशी टाळमृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेत शहरातील शेकडो रामभक्त सहभागी झाले होते
या शोभायात्रेला हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर पासून उत्कृष्ट देखावा असलेला रथावर मानवरूपी राम, सीता ,लक्ष्मण व हनुमान यांचा देखावा साकारण्यात आला व वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जय श्रीराम जयघोषात या मिरवणुकीची सुरुवात झाली यात्रेला शहरातील असंख्य महिला नव तरुण युवक,व्यापारी सह असंख्य जन होती ही शोभयात्रा सराफा लाईन मार्गे बाजार चौक गणेश चौक येथील श्रीराम मंदिरात पोहोचली जागोजागी यात्रेचे स्वागत करण्यात आले चिमुरड्यांची भजन महिलांचे फुगडी तसेच नवतरूण युवकांचे नृत्य व अ शे वेगवेगळ्या देखावे सादर करून प्रत्येक चौका चौकातील मंदिराचे दर्शन घेऊन व तेथील देवी देवतांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व शेवटी श्री परमेश्वर मंदिरातील यात्रेच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाम रायेवार सर यांनी उपस्थितांना समुपदेशन करत मार्गदर्शन केले
यावेळी या शोभायात्रेत हिमायतनगर शहरात चे प्रथम नागरिक नगराध्यक्ष कुणाल राठोड, परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, कमलाकर दिक्कतवार ,मिलिंद जन्नावार, उत्तरवार सर, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे ,भाजपा तालुका अध्यक्ष आशिष भाऊ सकवान, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, राम नरवाडे ,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे, विशाल राठोड ,शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार, बजरंग दल तालुका अध्यक्ष गजानन चायल, राम भाऊ सूर्यवंशी नितीन मुधोळकर अजय बेदरकर , सुधाकर चिठ्ठेवाड, निधी संकलन तालुका प्रमुख नागोराव माने सोनारिकर, सहप्रमुख बंडूभाऊ आनगुलवार, निधी संकलन प्रमुख अाडेल्लु भाटे, सहप्रमुख प्रतीक ठाकरे, कार्यालय प्रमुख अनिल शिंदे ,कार्यालय सहप्रमुख विशाल जाधव, प्रचारक परमेश्वर सूर्यवंशी ,सह प्रचारक नागेश शिंदे, वैभव हेंद्रे ,सावन रावते,किशोर शंकुलवार, राहुल खडके ,गणेश भाऊ रच्चे वार, सह परिसरातील सर्व रामभक्त यावेळी उपस्थित होते