शिंपी समाजाचा व ओबीसी चा नेता हरवला:- स्वप्निल रामगिरवार कंजारकर

प्रतिनिधी ( परमेश्वर सुर्यवंशी )

राजेश रापते यांच्या निधनाने समजावर शोककळा.

हीमायतनगर:- शिंपी समाजाला व ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी झटणारे राजेश रापते साहेब यांचं वयाच्या 60 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, नांदेड जिल्ह्यातीसह महाराष्ट्रातील एक संघटनात्मक नेतृत्व आज आपल्यातुन निघुन गेले यांच खुप दुःख होतं,त्यांच्या सोबत अनेक वर्षे चळवळीत काम केले,अशा या अनुभवी मार्गदर्शकाला आपल्यातुन अचानक निघून जातांना मनाला खुप दुःख होतं, राजेश रापते म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार होते ओबीसीं चळवळीत त्यांची खुप मोठी ओळख होती,ते अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महाराज महासंघाचे आंध्रप्रदेश व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष होते, जेष्ठ असुन सुद्धा यूवकांना मार्गदर्शन करून सोबत कार्य करत होते,या झुंजार नेत्यांच्या जाण्याने चळवळीचे खुप मोठे नुकसान झाले असे ओबीसीचे हदगाव हिमायतनगर तालुका अध्यक्ष स्वप्निल रामगिरवार कंजारकर यांनी हळहळ व्यक्त केली, सर्व समाजातुन त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त करत आहेत, अशा या झुंजार नेतृत्व आज आमचच्यातुन निघुन गेले याच आम्हाला कायमच दुःख राहील,त्यांचै विचार व चेहरा सदैव स्मरणात राहतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली व रापते साहेबांना चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो.