हिमायत्नगर कोविड सेंटरमध्ये असुविधेचा अभाव भाजपा तालुकाध्यक्ष यांचे तहसीलदार यांना निवेदन

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर कोविड सेंटरमध्ये असुविधा आढळून आल्या असल्यामुळे भाजपा कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष यांनी तेथील भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असताना विविध व्यवस्थेची पाहणी करण्यात आली हिमायतनगरतालुक्यामध्ये एकमेव कोविड सेंटर असल्यामुळे येथील आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू चे रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना त्यामध्ये हिमायतनगर तालुका अग्रेसर आहे आज हिमायतनगर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्राअंतर्गत जवळपास 60 ते 65 गाव यामध्ये येत असतात वाडी तांडा शहर असे मिळुन जवळपास रोजची हजारो संख्या या रुग्ण तपासणीसाठी येत असतो त्यामध्ये या करोणा महामारी मुळे प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे आज कोविड सेंटर म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या मध्ये रुग्णाला उपचार घेण्यासाठी ठेवली जात असते त्यामध्ये कोणत्याही गोष्टीची व्यवस्था त्या ठिकाणी केली जात नाही नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था नाही आंघोळीसाठी पाणी पुरवठा नाही वेळोवर नाष्टा त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली जात नाही अशा विविध समस्या येथील कोविड सेंटरला आढळून आल्याचे दिसत आहे ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आम्ही नगरपंचायतीचे संबंधित अधिकारी अभियंता रमाकांत बाच्चै यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असताना काही गोष्टीचा पुरवठा त्या ठिकाणी झालेला आहे पण येत्या काही दिवसांमध्ये जर का येथील रुग्णासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व तेथील लाईटची व्यवस्था नाही झाल्यास भारतीय जनता पार्टी हिमायतनगर यांच्या मार्फत तालुका अध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी व येत्या दोन दिवसांमध्ये सर्व रुग्णांना पाण्याची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात यावी असे निवेदन नायब तहसीलदार राठोड साहेब यांना देण्यात आले त्यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्ते भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी शहरं अध्यक्ष खंडू चव्हाण परमेश्वर सुर्यवंशी बालाजी ढोणे विनोद दुर्गेकर सुभाष माने ल्क्षमणराव जाधव प्रल्हाद जाधव माधव कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते