रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या घटना मध्ये वाढ :- सौ शितल पाटील ,कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल

प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर – तामसा सर्कल मधून ये जा करणाऱ्या नागरिकांना रोड च्या कामामुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीचा बेजबाबदार कारभारामुळे तामसा मार्गे प्रवास करणार्‍या नागरिकांचे अनेक अपघात या रोडवर होत आहेत रोडवर जखमी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे असाच प्रकार तामसा येथे सुरू असलेल्या एका कामावरील रोड रोलर उमरी येथील शंकर विश्वनाथ अमृते यांचा पायावरून गेल्यामुळे त्यांचा पाय फ्याकचर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांची प्रकृती बरी असली तरी ते अपघातातून बालबाल बचावले आहे तात्काळ रुद्राने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकांनी कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ शीतल पाटील यांनी कंपनी मालकास दिला आहे
तामसा मार्गे हिमायतनगर उमरखेड महागाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या ठेकेदाराकडून अतिशय बोगस पद्धतीने सुरू आहे सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते असल्याने अनेक नागरिकांनी संबंधित का मा विरोधात तक्रारी केल्या मात्र राजकीय वरदहस्तामुळे ठेकेदार यांनी अधिकच मनमानी पद्धतीने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करत आहे रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेले असून या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी गौण खनिजाची रॉयल्टी पेक्षा दुप्प टीने खनिज खोदण्यात आल्याचे परिसरातील ख दांणीच्या खोलीवरून दिसून येत आहे तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून गोण खनिज उत्खननाचे नियम पायदळी तुडवीत रात्रीला जेसीबीच्या साह्याने मुरूम काढून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून या कंपनी कडून अतिशय बोगस काम केल्या जात आहे ह्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी
खरे पाहता ठेकेदाराने कामावर वाहने रिव्हर्स घेताना पाठीमागे एक व्यक्ती असणे बंधनकारक असते मात्र असे न करता बेजबाबदारपणे कामे उरकून आपली देयके काढण्यासाठी कंपनी मालका कडून आटापिटा केला जात आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामावर अनेक अपघात घडले दोन ते तीन जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून ठेकेदाराने ह्या कामावर मनुष्यबळ वाढून ये-जा करणार्‍या नागरिकांना सुरक्षेची हमी देत रस्त्याचे काम चागले करावेत अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ शीतल पाटील यांनी केले आहे