
हिमायतनगर …प्रतिनिधी
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्च 2021 पासून सर्व महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींना कोरोनाची लस मोफत देण्यात येत आहे असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले त्या योजनेचा हिमायतनगर शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान हिमायतनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी. डी. गायकवाड यांनी केले आहे
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे त्याचा पहिला टप्पा आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना देण्यात आला आत्ता एक मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे त्यामध्ये कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी 10 हजार खासगी रुग्णालयाची सुद्धा निवड करण्यात आली आहे आयुष्यमान भारत योजनेत तील महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण रुग्णालयातून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील साठ वर्षाच्या वरील नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आव्हान हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालया तर्फे करण्यात आले आहे कोरोना ह्या संसर्गजन्य महामारीचा फैलाव सध्या हिमायतनगर शहरात अधिक वेगाने होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे मध्यंतरीच्या काळात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव कमी झाला होता पण आता इतक्यातो अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे आपल्या नांदेड जिल्ह्या तील हिमायतनगर शहरात सध्या घडीला पाच कोरो ना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये हिमायतनगर शहरातील उच्चभू वस्तील रुक्मिणी नगर येथील दोन जण , दत्तनगर येथील एक ,छत्रपती चौक येथील एक त्या सह एक पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यामुळे आपण सद्या ग्रीन झोन मध्ये आहोत म्हणून पूर्णतः सेफ आहोत असे म्हणता येणार नाही येणाऱ्या काळात आपण आपली सावधानता बाळगायला हवी शासनाने दिलेल्या नियम व अटीचे तंतोतंत पालन करावे असे आव्हान सुद्धा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी केले आहे
कोरोना संसर्गजन्य महामारी या संभाव्य संकटावर जालीम उपाय अजुन तरी आलेला नाही त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे हीच खर्या आपली जीमेदारी ठरेल अत्यावश्यक कामासाठीच नागरिकांनी घराबाहेर पडावे घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावून निघावे ,पाच व्यक्तीच्या वर एका ठिकाणी जमू नये, वेळोवेळी हात साबणाने नियमित धुवावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, लग्न समारंभ अगदी साधेपणाने साजरे करावेत अशा अनेक नियम व अटींचे तंतोतंत पालन करून कोरो ना संसर्गजन्य रोगाला परत पाठविण्यासाठी सर्वांनी सज्ज होऊन हा सामूहिक लढा द्यावा असे आव्हान सुद्धा यावेळी हिमायतनगर येथील वैद्यकीय अधिकारी डी.डी.गायकवाड यांनी केले आहे
