नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या आदेशाला खो गुत्तेदार, रस्त्याच्या कामासाठी वापरात आहेत गटाराचे पाणी

हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी


शहरातील परमेश्वर मंदिर कमान ते उमर चौक परिसरात होत असलेल्या रस्त्याच्या कामात संबंधित गुत्तेदारा कडून या ठिकाणी असलेल्या घाण गटारातील पाणी टँकर मध्ये घेऊन या रस्त्यावर टाकले जात आहे त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे ह्याचा नाहक त्रास परिसरातील दुकानदार व नागरिकांना सोसावा लागत आहे संबंधित गुत्तेदाराची तक्रार येथील दुकानदार यांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे केली असता त्यांनी संबंधित ठेकेदाराला हे पाणी टकणे तात्काळ बंद करा असे आदेश देऊन सुद्धा संबंधित ठेकेदाराकडून नगरपंचायत च्या मुख्य अधिकारी यांच्या आदेशाला खो ? मिळत असल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे ह्यांच्या वर कोरोना महामारी मध्ये अशे घाण पाणी वापरल्यामुळे त्यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान, व व्यापारी वामनराव पाटील वडगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे
मागील काही दिवसांपूर्वी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रेल्वे गेट तहसील कार्यालय ते उमर चौक या रस्त्याचे भूमिपूजन केले होते तेव्हा पासून हा रस्ता एकदम मंद गतीने चालू आहे अशा बातम्या सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे विद्यमान आमदार साहेब यांनी ह्या बाबी कडे लक्ष देऊन हे काम तात्काळ करण्याचे आदेश द्यावे
या रस्त्याचे गुत्तेदार यांनी त्यांच्या कामांमध्ये रस्त्यालगत असलेल्या नाल्या मधील गटारातील साचलेले घाण पाणी त्यांच्या कामावरील एका टँकरमध्ये पाईपने भरून तेच घाण पाणी या रस्त्यावर टाकत आहेत ह्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण होत आहे अगोदरच कोरोणा महामारी मध्ये येथील नागरिक परेशान असताना येथील गुत्तेदारा कडून रस्ता लगत असलेल्या गटारातील घाण पाणी रस्त्यावर वापरण्यात येत असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे त्यामुळे येथील व्यापारी व पत्रकारांनी अशी तक्रार संबंधित नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे करून सुद्धा या गुत्तेदाराणे आपला मनमानीपणा चालूच ठेवला आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी या गुत्तेदारा विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण, व येथील व्यापारी वामनराव पाटील वडगावकर यांनी केली आहे