हिमायतनगर महसूल विभागाची धडाकेबाज कार्यवाही , गौण खनिज करणाऱ्यावर छापा टाकून एक जे.सी.बी.सह ट्रॅक्टर जप्त

हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी,


तालुक्यातील मौजे धानोरा, वारंगटाकळी परिसरात अवैध गौण खनिजांचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच हिमायतनगर तहसीलचे तहसीलदार गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पुणेकर , तलाठी शेख साहेब व वाहन चालक रजाक भाई यांनी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान धानोरा, वारंगटाकळी परिसरात सापळा रचून येथील गौण खनिज करीत असलेल्या जे.सी.बी. सह एका ट्रॅक्टर वर धडक कारवाई करत ते हिमायतनगर पोलीस स्थानकात आणून लावले त्यामुळे तालुक्यात गौण खनिज करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे

   

शहरासह तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल धारकांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यासाठी लागणारी रेती व मुरूम हे शहरातील गोरगरीब नागरिकांना बेभाव दराने विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल हे माफिया चोरून घेत आहेत अगोदरच नांदेड जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने अनेक ठिकाणी रेती माफियांचा हैंदोस सुरू आहे मागील काही दिवसा पूर्वी उमरखेड तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर रेती मफियानी प्राणघातक हल्ला केला होता त्यामुळे अनेक अधिकारी रेती माफिया विरोधात कार्यवाही करण्यासाठी समोर येत नाहीत ह्याचाच फायदा घेऊन हिमायतनगर तालुक्यात मागील कित्येक दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज व रेती तस्करीच्या बातम्या अनेक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आल्या होत्या याची दखल म्हणून हदगाव येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब व हिमायतनगर चे कर्तव्यदक्ष तहसीलदार गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर चे तलाठी दत्तात्रय पुणेकर व तलाठी शेख तहसिलदार साहेबांचे वाहन चालक रजाक भाई यांनी काल दिनांक 11 जून रोजी रात्री उशिरा मौजे धानोरा व वारंगटाकळी परिसरात सापळा रचून येथील गौण खनिज करणाऱ्या तस्करा विरोधात धडक कार्यवाही करत जाय मोक्या वर आलेल्या जे.सी.बी.सह ट्रॅक्टर वर कारवाई करत ते हिमायतनगर पोलिस स्थानकात आणून लावले ही हिमायतनगर तालुक्यातील आतापर्यंत ची सर्वात मोठी कारवाई समजल्या जात आहे त्यामुळे तालुक्यातील वाळू माफिया सह गौण खनिज तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे