
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यात आज पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी महिलांचा सन्मान करुन जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी कटर पणे उभे आहो निःसंकोचपणे आम्हाला आपला भाऊ म्हणून कधीही हक्क मारावी आम्ही हजर आहोत असे वचन यावेळी उपस्थित महिलांना दिले त्याच बरोबर उपस्थित सर्व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी व पत्रकार बंधु उपस्थित होते
जगभर महिला दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गुगलने आजचं डुडल महिलांना समर्पित केलं आहे. एका 3D अनिमेशनच्या माध्यमातून हे डुडल तयार करण्यात आलं आहे. न्यूयॉर्क आणि लंडनमधील काही कलाकारांनी ते साकारलं आहे. त्यात या दिवसाच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
या व्हीडिओच्या सुरुवातीच्या भागात 1800 ते 1930 या काळातील कामगार चळवळीवर भर देण्यात आला आहे. नंतर 1950 ते 1980 हा काळ दाखवण्यात आला आहे. हा काळ महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. त्या काळात महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानतेसाठी जोमाने प्रयत्न होऊ लागले होते. त्यानंतर 1990 ते आजपर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. गेल्या 100 वर्षांत महिलांच्या हक्काबाबत काय प्रगती झाली हे दाखवण्याचा उद्देश असल्याचं गुगलने सांगितलं आहे.
पुरातन काळात लिंगाधारित भूमिका आणि समाजातील महिलांचं स्थान याविषयी असलेले गैरसमज दूर करून स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या महिलांना हे डुडल समर्पित करत असल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे.
14 प्रेरणादायी महिलांची 14 प्रेरणादायी कोट्स
महिलांना पुरुषांइतकेच अधिकार मिळतात का? – बीबीसी रिसर्च
जगभरात गेली कित्येक वर्ष लोक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात कशी झाली?जागतिक महिला दिन कधी सुरु झाला?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
