कृषी पंप विज बिल धारकांनी विजेचा भरणा करा,
👉🏻थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यांमध्ये भरण्याची सवलत..

हिमायतनगर प्रतिनिधी
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेक गोर गरीब नागरिकांना जास्त वीजबिले आलीत. याबाबत अनेक ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात होती पण. वीजबिले माफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी करून सुद्धा कोणाचेच वीजबिले अद्याप रद्द करण्यात आलेली नाहीत. दरम्यान आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणचे सक्त आदेश जारी करण्यात आले आहेत त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील सर्व कृषी पंप वीजबिल धारका सह इतर नागरिकांनी आपले थकित वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करा असे नम्र आवाहन शहरी सहाय्यक अभियंता पी.पी.भडंगे साहेब यांनी केले आहे
तालुक्यातील कृषी पंप विज अंतर्गत शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत त्यामुळे आपण या सवलतीचा लाभ घेऊन आपल्याकडील थकीत बिल तात्काळ भरावेत कालच हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सौ सुरेखा सातव त्यांचे प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सातव यांनी त्यांच्या कडील अंदाजे 29 हजार रुपये थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य केले तसेच आपणही आपल्याकडील राहिलेले थकित बिल तात्काळ भरून महावितरणला सहकार्य करावे थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यांमध्ये भरण्याची सवलत सुद्धा महावितरणने दिली आहे या थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणने घेतला आहे आपण पण आपल्याकडील थकीत वीज बिल भरून सहकार्य करावे असे आव्हान शहरी सहाय्यक अभियंता पी.पी.भडंगे साहेब यांनी केले आहे
यावेळी उपकार्यकारी अभियंता उपविभाग लोने साहेब, सहाय्यक अभियंता शहरी पी.पी.भडंगे साहेब ,पी.जी. शिंदे वरिष्ठ तंत्रज्ञ, एस.एस. अाडेराव वरिष्ठ तंत्रज्ञ, यु.जी. ढगे वरिष्ठ तंत्रज्ञ, आर. ए. बक्केवाड तंत्रज्ञ ,आ. ए. सिद्धनाथ तंत्रज्ञ सह आदी कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत
