
हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,सोयाबीन,ऊस, मूग, उडीद,सह तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर सगट शेतकरी राजाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनशक्ती संघटनेच्या वतीने दि 1ऑक्टोबर. रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की ऐन दिवाळी समोर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कापूस सोयाबीन सारखे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने तालुक्यातील सर्व शेतकरी परत संकटात आला आहे सध्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांना कोंबदेखील फुटले आहेत.तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडाचे खराटे झाले. शेतीसाठी लागलेला खर्चही शेतकऱ्यांचा निघाला नाही़ त्यामुळे तालुक्यातील शेतकरी राजा हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा,सर सगट सर्वच शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी,शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा व प्रत्येक शेजाऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी हिमायतनगर जनशक्ती संघटनेच्या च्या वतीने करण्यात आली आहे यावेळी उपस्थित उमाकांत पाटील प्रदेशाध्यक्ष बाळु पाटील शिरफुले जिल्हा प्रमूख दिनेश जाधव जिल्हा सचिव पिटु पाटील रंगराव देशमुख विजु पाटील सोळंके आदि कार्यकर्ते उपस्थित होते
