
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर
हिमायतनगर :-भोकर हिमायतनगर या महामार्ग रस्यावर रेल्वेगेट पासून सवना ज. या अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने तालुक्याचे भूमिपुत्र असलेल्या आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला व लवकर द्या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी ह्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले होते पण आगामी पावसाळ्यात या रस्त्याचा अर्धवट कामामुळे येथे चिखल होवून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सदरील कामाकडे जातीने लक्ष देऊन ह्या कामाची गती वाढवण्यात यावी अशा सूचना संबंधित गुत्तेदा रास देण्यात याव्या अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की संबंधित रोड च्या गुत्तेदारास वेळोवेळी थोडी सुचना देऊनही या कामाला कुठल्याच प्रकारची गती मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठवाडा ते विदर्भ नागपूर उपराजधानी ला जोडण्या करीता केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी भोकर ते वणी या अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करून कोट्यावधी रूपयाचा विकास निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. भोकर कडून हिमायतनगर येथील नवीन दारलूम रेल्वेगेट पर्यंत शारदा कंस्ट्रक्शन कंपनीने रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण, सिमेंटीकरनाचे काम त्यांनी वेळेत पूर्ण केले आहे. परंतु रेल्वेगेट तहसील कार्यालय पासून पुढे हे काम करणाऱ्या गुत्तेदारांनी गेल्या अनेक वर्षापासून सदरचे काम केले नाही. सदर रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.नागरिकांना ये जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.आता पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. गावाच्या तोंडा लगत असलेल्या प्रसिद्ध अशा महसोबा नाल्याचे काम खोदून तेथील जुना पूल गुत्तेदा राणे नष्ट केला आहे.त्यामुळे शहरात ये जा करणाऱ्या नागरिकांना ह्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे जे काम चार वर्षांत नाही जमले ते काम ह्या पंधरा दिवसांत कशे करणार ? हा चर्चेचा विषय ठरत आहे.या तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी संबंधित गुत्तेदा रास व प्रशासकीय यंत्रणेला घेवून या रस्त्याचे भूमिपूजन पार पाडले आणी आमदार महोदयांनी प्रशासकीय यंत्रणेला व गुत्तेदार यांना त्यावेळेस ठणकावून सांगितले होते की,हे काम वेगाने पूर्ण करा, ह्या कामात हाय गाय केली तर मी खपवून घेणार नाही. अशी सक्त ताकीद सुधा दिली होती. परंतु संबंधित यंत्रणेने पहीले पाढे पंचावन्न चा पाढा गिरवायला सुरूवात केली.आमदार महोदयांच्या सुचनेला इथे खो मिळत आहे. हे येथील कामावरून स्पष्ट दिसून येत आहे. आता पावसाळा सुरू होण्याच्या अतिशय कमी कालावधी राहिलेला आहे. या बाबतची गंभीर दखल आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेवून कासवगतीने सुरू असलेल्या कामाला हरणाची गती देवून या भागातील नागरिकांची भविष्यात होणारी गैरसोय थांबवावी. अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
