परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी

कोरोनाच्या महाभयंकर काळात आपल्या जिवाची पर्वा न करता पञकार क्षेञातील असामान्य व्यक्तीमहत्व मा.श्री शेख अस्लम यांनी आपल्या परीने अनमोल योगदान दिले यांचीच दखल घेत दि.५ रोजी शनिवारी पुणे येथील पञकार भवनात परभन्ना फाउंडेशन च्या वतीने आयोजित कृतज्ञता पुरस्कार-२०२० च्या पुरस्कार सोहळ्यात देगलूरचे युवा पञकार तथा दै.भास्करचे शेख अस्लम यांना “कृतज्ञता पुरस्कार-२०२०” ने सन्मानीत करण्यात आले असून या कार्यक्रमास मा.डाॅ.आविनाश भोंडवे (अध्यक्ष-आयएमऐ,महाराष्ट्र), मा.अरुनजी खोरे (माजी संपादक), मा.रविंद्र धारिया (अध्यक्ष-वनराई) संस्थेचे संस्थापक मा.प्रा. गणेश चप्पलवार संस्थेचे अध्यक्ष मनिषा उगले यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कोरोनाच्या महाभयंकर काळात समाजासाठी माणुसकी जपत कुंटूबांची व स्वःताच्या जिवाची पर्वा न करता केलेल्या कामाबद्दल हा गौरवपुर्ण सन्मान असल्याचा प्ररभन्ना फाउंडेशनचे संस्थापक मा.श्री गणेश चप्पलवार यांनी सांगितले आहेत. दरम्यान हा पुरस्कार प्राप्त शेख असलम हे अगदी कमी वयातच पञकार क्षेञात जिव ओतून अविरत व प्रामाणिकपणे काम करणार्या शेख अस्लम यांना हा गौरवास्पद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकीचा वर्षाव होत असून हा पुरस्कार देगलुरच्या युवा पञकरांना मिळणे हे खुपच अभिमानस्पद बाब असल्याचे प्रतिक्रीया देगलूरच्या विविध क्षेञातील मान्यवरांनी व्यक्त केले आहेत.
