ओम मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल मध्ये अपेंडीक्सची यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न,डॉक्टर लखपत्रे व डॉक्टर भुरके यांच्या प्रयत्नास यश

हिमायतनगर प्रतिनिधी


तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षापासून ग्रामीण भागातील रुग्णांना अविरत सेवा देणारे ओम मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शिवप्रसाद लखपत्रे हे ग्रामीण भागातील नागरिकांना नांदेड सारख्या ठिकाणी जाऊन शस्त्रक्रिया करणे हे परवडत नसल्याने शहरातच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीन द्वारे एकदम अल्प दरात येथील अनेक रुग्णांच्या अवघड शस्त्रक्रिया करून ते अनेकांना बरे करत आहेत.


अपेंडिक्स, हायड्रोसिल आतड्याचे आजार ,स्त्रियांच्या स्तनातील गाठी, गर्भपिशवी सह किडनी स्टोन अशा विविध प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया ह्या हिमायतनगर सारख्या ग्रामीण क्षेत्रात करण्यात येत आहेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजनी येथील जावई बालाजी लंगडे हे मूळचे सावरगाव (मेट) तालुका भोकर येथील असून त्यांना मागील कित्येक दिवसा पासून अपेंडीक्स ह्या आजाराचा त्रास होता व ते अनेक ठिकाणी जाऊन प्राथमिक उपचार घेत होते पण त्यांना कुठेच चागलं उपचार मिळाला नाही अखेर त्यांनी त्यांच्या सासरवाडी च्या सल्ल्यानुसार हिमायतनगर शहरातील ओम हॉस्पिटल गाठले येथील ओम हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शिवप्रसाद लखपत्रे साहेब व डॉक्टर माधव भुरके यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला ते पण नांदेड सारख्या ठिकाणी न जाता एकदम अल्प दरात त्यांच्या वर दि.17 मे रोजी येथील तज्ञ डॉक्टरानी अतिशय अवघड असणारी शत्रक्रिया करून रुग्णांच्या पोटातील 70 ते 80 सेमी चा मासाचा गोळा काढला.


यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी ओम हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शिवप्रसाद लखपत्रे साहेब व डॉ.माधव भुरके , ओटी असिस्टंट तोटेवाड दादा व सर्व टीमचे त्यांनी आभार मानले.