केंद्राचे ऑक्सीजन प्लांट वगळून चव्हाण यांनी प्लांट आणला असेल तर त्यांचे अभिनंदन – प्रवीण साले

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना मोठा आधार देण्यासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दोन ऑक्सिजन प्लांट शिवाय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जर ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी मंजुरी मिळवली असेल तर त्यांचे अभिनंदन मात्र केवळ श्रेय लाटण्यासाठी चव्हाणांनी खोट्या बातम्या प्रसिद्ध करू नयेत असा उपरोधिक सल्ला भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाण यांनी वर्तमानपत्रातून लेख लिहून त्यांचे अभिनंदन केल्याबद्दलही साले यानी चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे .
कोरोना महामारीच्या काळात मृत्यू रोखण्यासाठी अत्यंत ओक्सिजन महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने नांदेड साठी दोन ऑक्सीजन प्लांट मंजूर केले. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एक व जिल्हा रुग्णालयात एक ऑक्सीजन प्लांट मंजूर करण्यात आले असून दोन्ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी एक प्ल्यांट 30 मे पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकतीच दिली होती. शिवाय या दोन्ही कामाच्या उभारणीची पाहणी प्रत्यक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली होती. दोन्ही प्लांटला मंजुरी केंद्र सरकारने दिल्यानंतर आता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आणखी एक प्लांट मंजूर केल्याची बाब नुकतीच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून पहावयास मिळाली . यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रयत्नातून हा प्लांट मंजूर झाल्याचे सांगत पालकमंत्री चव्हाण यांनी नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले जर हे दोन प्लेट वगळून तिसरा प्लॅन मंजूर केला असेल तर निश्चितपणे चव्हाण यांचे अभिनंदन मात्र खोटी प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि आपणच पलॅट मंजूर केले असे दाखविण्यासाठी अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले असतील तर ही जनतेची दिशाभूल आहे असेही प्रवीण साले म्हणाले . पालकमंत्री अशोक चव्हाण यांना इतरांच्या कामाचे श्रेय लाटण्याची सवय असून यापूर्वी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून रस्ते विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या दोनशे कोटी रुपयांचा निधी वरुनही चव्हाण यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता असेही ते म्हणाले.
नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सहकारी साखर कारखाने आहेत मात्र आपल्या सहकारी साखर कारखान्यातून ओक्सिजन निर्मितीसाठी त्यानी का प्रयत्न केले नाहीत असा सवालही प्रवीण साले यांनी उपस्थित केला आहे . मांजरा सहकारी साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मितीसाठी दिलीपराव देशमुख यांनी प्रयत्न केले तर उस्मानाबाद येथे अभिजीत पाटील यांनी आपल्या सहकारी साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील रुग्णसेवा अथवा जनतेच्या आरोग्याची फारसी काळजी नाही त्यामुळेच त्यानी आपल्या कारखान्यातून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारला नाही परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी आपणच सर्वकाही करत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न चव्हाण यांच्याकडून केला जात आहे असा टोलाही साले यानी लगावल आहे.
दरम्यान अशोक चव्हाण महाविकास आघाडी सरकारमधील एक जबाबदार मंत्री आहेत मात्र राज्य सरकारकडून नांदेड येथे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले त्यांना ऑक्सिजनची ची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये का यश आले नाही? एकीकडे केंद्र सरकारकडून सुविधा मिळवून घ्यायच्या दुसरीकडे केंद्र सरकारवर आरोप आणि टीका करायची ही भूमिका चव्हाण आणि बदलावी असा सल्लाही साले यांनी दिला आहे.