होळी2021: ही होळी आहे विशेष, ४९९ वर्षांनतंर आला अदभुत योग होळी पौर्णिमावर कोरोणाचे सावट


  
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी


हिंदू धर्मातील होळी सण हा सर्वात मोठा व आनंदाचा सण आहे आपल्या मनातल्या रंगाला बाहेर आणुन मनसोक्त व्यक्त करणारा सण म्हणजे होळी पौर्णिमा व ध्वलिवंदन होय मात्र यावेळी यावर कोरोणाने आपली पकड घट्ट केली आहे कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे हिंदू धर्मातील समाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येवू लागला आहे आज होळी सण बजारा समाज ढोल ताशा वाजवित गाजवित सण साजरा करण्याची रुढी परंपरा आहे आज या महामारी मुळे त्यावर ही परिणाम झाला आहे आज ४०० वर्षांपासून हि परंपरा चालत आलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा ही वेळ की आज होळी पौर्णिमा चांगली केली जात नाही नाही बाजारात घाटी विकली जात नाही देव तारी त्याला कोण मारी बोल आज खरे होताना दिसुन येत आहे मात्र यावर्षी होळी योग आला आहे २०२१वर्षे
फाल्गुण मास पैार्णिमेला होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेकांसाठी होळी हा सण आनंदाचा, मुक्त रंगांची उधळण करण्याचा सण आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह देशभरात होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. पैार्णिमेच्या ‘होलीका’ दहन केल्यानंतर  दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते. यंदा २८ मार्चला ‘होलीका दहन’ करण्यात येणार असून २९ मार्चला रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. यंदाही कोरोनाचे सावट असले होळी ही खास आहे. या वेळेस होळी काही विशेष कारणांनी खास ठरली आहे. कारण ज्योतिष शास्त्रा तील जाणकारांच्या मते, यावेळी होळीला ४९९ वर्षांनी ग्रहांचा अदभुत, दुर्मिळ योग जुळून आला आहे. हे दुर्मिळ योग असा असेल हे जाणून घेऊ..
यंदाची होळी खास असण्याचे कारण म्हणजे,  तब्बल ४९९ वर्षांनी ग्रहांचा अदभुत, दुर्मिळ योग जुळून येणार आहे. २८ मार्चला पौर्णिमेच्या दिवशी  चंद्र हा कन्या राशीत प्रवेश करेल,  तर बृहस्पति आणि शनी ग्रह स्वत:च्या राशीत विराजमान असेल.  ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा असा महासंयोग १५२१ या वर्षात घडला होता. त्यामुळे यंदाच्या होळीला असा महासंयोग पुन्हा तब्बल ४९९ वर्षांनंतर घडणार आहे. रंगाचा व आनंदाचा हा सण यंदा आणखी दोन विशेष योग घेऊन आला आहे. तो म्हणजे होळीला सर्वार्थसिध्दी योग व अमृत सिध्दी योग सुध्दा असणार आहे. या दोन्ही योगांना शुभ मानले जाते.