
हिमायतनगर प्रतिनिधी
हिंगोली लोकसभा मतदारसंघात मागील 8 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे हिंगोली सह हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप ह्याचे पंचनामे करण्यात आले नसल्याने आता कुठलेही पंचनामे न करता त्यांना जिल्हाधिकारी यांनी जमेल त्या पद्धतीची भरीव मदत देऊन सहकार्य करावे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब , कृषी मंत्री दादाजी भिसे व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना सुद्धा मतदार संघातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले
हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे अगोदरच अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि आता त्यांच्यावरील व्यापाऱ्यांचे कर्ज ह्यामुळे जमेल तेवढ्या लवकर सहानुभुतीपूर्वक विचार करून शेतकरी बांधवांना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी जेणे करून त्यांना येणारी दिवाळी चागली करता येईल अशी मागणी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे हिंगोली मतदारसंघातील किंनवट माहूर,सह हिमायतनगर भागात गुलाब चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.हिंगोली सह नांदेड जिल्ह्यातील सर्वच पिके पाण्याखाली गेल्याने येथील शेतकर् यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे मतदारसंघातील शेतीची स्थिती पाहता प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी व नांदेड जिल्ह्यात सरासरी टक्केवारीच्या तुलनेत 100 टक्के पाऊस झाला आहे या आमच्या सरकारने सर्व शेतकऱ्यांना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना तातडीची मदत द्यावी अगोदरच शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात संताप होत आहे याची सरकार ने तात्काळ दखल घेऊन संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी ही भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब , पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली आहे
