गट प्रवर्तक व आशा स्वंयसेविका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर


प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1

हिमायतनगर तालुक्यातील प्रा.आ. केंद्र सरसम व चिचोर्डी केंद्र अंतर्गत 51 आशा व 2 गट प्रवर्तक दि.15-06-21 पासून काम बंद आंदोलन करीत बेमुदत संपावर गेले आहेत. याबाबतचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश प्रभाकर राव पोहरे व आशा समन्वयक श्री कृष्णा पांडुरंग चौधरी यांना मंगळवारी देण्यात आले. महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समीती कडून बेमुदत काम बंदचे आवाहन झालेले आहे. या वेळी गट प्रवर्तक श्रीमती पोर्णिमा कांबळे, गट प्रवर्तक श्रीमती सुलोचना भंडारे, श्रीमती जयमाला कांबळे, श्रीमती गिरजाबाई कोठेकर , साहेरा शेख नजीर शेख, श्रीमती कविता सावते, श्रीमती इंदुबाई माने आदी उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी यांचे पगार थांबले असुन शासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसुन येते आज कोविड १९ मध्ये आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली कधी तर उपासी पोटी काम केले जर का यांना वेळेवर पगार नाही दिला तर त्यांच्या कुटुंबीयांना पोसणार कोण हा देखील प्रश्न निर्माण होतो प्रशासनाने लाखो रुपयांची तरतूद केली असताना देखील आरोग्य कर्मचारी यांचा पगारी का होत नाहीत त्यांना वेळेला मानधन का दिले जात नाही त्यामुळेच काही आरोग्य कर्मचारी यांनी एका निवेदनाद्वारे विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.