करंजी येथे घरपोच कोविड टेस्टीगची सुरुवात माझे गाव माझे कुटुंब ….सरपंच बालाजी पुठ्ठेवार

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे गावचे सरपंच बालाजी पुट्टेवार यांनी माझे गाव माझे कुटुंब अशासंकल्प करून गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरपोच कोविड टेस्टिंग ची मोहीम राबवून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना नावाच्या महा बिमारी ने धुमाकूळ घातला असून प्रत्येक गावांमध्ये कोरोना संसर्गजन्य रोग दिवसेंदिवस पसरत असल्यामुळे गावातील लोकांना वेळोवेळी उपचार व्यवस्था व त्यांच्या जीवाची हमी आपण कशी घेतली पाहिजे या गोष्टीकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे आज करंजी मध्ये जवळपास 20 ते 25 कोरोणा बाधित संख्या आजारी असताना हे चित्र समोर वाढू नये म्हणून सरपंच व उपसरपंच यांनीतात्काळ आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावातील नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन कोरोणा चाचणी करून घेतली त्यांना कोरोणा संदर्भामध्ये काळजी घेण्यास सांगितले व आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांना काॅरनटाईन होण्यास सांगितले आज गावा गावां मध्ये कोरोनानेआपले जाळे पसरविले आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सुरक्षित राहिले पाहिजे वेळोवेळी हात स्वच्छ धुणे स्वच्छ पाणी वापरणे वेळोवेळी मास्कचा वापर करणे सॅनिटायझर आजूबाजूला घाण कचरा या गोष्टी कडे लक्ष देणे अशा अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी आम्ही ग्रामपंचायत सदस्य व आमची बावडी सतत प्रयत्नशील आहोत माझे गाव माझे कुटुंब माझी जबाबदारी या म्हणीप्रमाणे गावातील नागरिकांना असुविधेचा अभाव निर्माण होउ देणार नाही याची पूर्णपणे खात्री गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक या सर्व लोकांनी आज करंजी येथे प्रत्येक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची पूर्णपणे माहिती घेऊन आज एक आदर्श निर्माण केला आहे असेच इतर गावातील सरपंचांनी करावी असे आव्हान देखील सरपंचाने यावेळी पत्रकारांशी बोलताना केले आहे उपस्थित गावाचे सरपंच बालाजी पुठ्ठेवार उपसपच पांडुरंग सुर्यवंशी आरोग्य अधिकारी डॉ प्रताप परभणकर पो.बापुराव मिराशे शिवाजी पवार परमेश्वर सुर्यवंशी आमोल जाधव ज्ञानेश्वर पुठ्ठेवार श्रीरंग सुर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते