हिमायतनगरात भाजपाचा चक्काजाम आंदोलनाने तासभर वाहतूक ठप्प .


प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर| भारतीय जनता पार्टी तालुका शाखा हिमायतनगरच्या वतीने दि.२६ जून रोजी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री परमेश्वर कमानीजवळ ओबीसी समाजावर झालेल्या अन्याय आणि मराठा आरक्षणासाठी होत असलेली चालढकल या निषेधार्थ नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा हिमायतनगर तालुका प्रभारी अशोक नेम्मानीवार यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजपाच्या वतीने २६ जुनं रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या सूचनेने व भाजपा पदाधिकारी पक्ष निरीक्षक तथा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर भारतीय जनता पार्टी यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाचा निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गाचे ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. एक वर्षाच्या मुदतीत ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आदेश असताना या निष्क्रिय सरकारने गंभीर दुर्लक्ष केल्यामुळे आज राजकीयदृष्ट्या मोठा आघात ओबीसी समाजावर झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तथा उद्धव ठाकरे सरकारच डोकं ठिकाणावर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने रास्ता रोको (चक्का जाम) आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी  भारतीय जनता पक्षाचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष आशिष भाऊ सकवान जिल्हा चटणीस सुधारकर पाटील सोनारीकर, शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, ओबीसी सेल ता.अध्यक्ष रामेश्वर गड्डवाड, ज्ञानेश्वर शेवाळे, मधुकर पांचाळ, दत्ता शिराणे, पवन करेवाड, अहेमद भाई, नितिन मुधोळकर, परमेश्वर सुर्यवंशी, विनायक ढोणे, बालाजी ढोणे, विनोद दुर्गेकर, गंगाधर मिरजगावे, सूरज चिंतावार, संजय कुरमे, नागोराव शिंदे, निलेश चटने, प्रमोद भुसारे, प्रदीप नराहरे, रायेवार काका व ईतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.