राजकारणापेक्षा समाजकार्य हीच शिवाजी महाराज यांची शिकवण:मुख्याध्यापक गजाननराव सुर्यवंशी

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शक म्हणून गजाननराव सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात नागरिकांना व बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले राजकारणापेक्षा समाजकार्य सर्वात मोठं कार्य आहे हि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातुन शिकायला मिळते आपण रामायण महाभारत तर वाचायला पाहिजे मात्र शिवचरित्र वाचने व ते आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे असे आपल्या भाषणात सांगितले आहे आज
करंजी येथे भव्य शिवजन्मोत्सव साजरा त्याप्रसंगी करंजी येथील संपूर्ण नागरिक शिवजन्मोत्सवला उपस्थित होते तसेच करंजी तील संपूर्ण #चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या #जीवनचरित्रावर भाषण केले. त्याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे #अध्यक्षसंजूपाटील दुधडकर, उपाध्यक्ष गावचे पोलीस पाटील #बापुरावजीमिराशे, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कै. श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम येथील मुख्याध्यापक व तसेच करंजी नगरीचे भूमिपुत्र आदरणीय #गजाननसूर्यवंशीसर , करंजी नगरीचे भूमिपुत्र प्रा. डॉ. #शेषरावमाने, #सरपंच बालाजी पुटेवाड, #उपसरपंचपांडुरंगसूर्यवंशी, तंटामुक्त अध्यक्ष रंगराव पाटील, सदस्य शब्बीर पठाण, प्रमुख पाहुणे ग्रामसेवक साहेब, जिल्हा परिषद शिक्षक चव्हाण सर, ज्येष्ठ नागरिक नारायणराव सूर्यवंशी. इत्यादींनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, शिवचरित्र यावर भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना #प्रथम, #द्वितीय आणि #तृतीय व प्रोत्साहनपर बक्षीस वाटप करण्यात आले…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता माकोडे व सुप्रिया जाधव यांनी हिने केले, तर कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन माझे मामा दैनिक लोकप्रश्न चे पत्रकार परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले, त्यांच्या अथांग प्रयत्नामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.