
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षणा मुळे सदर लाखो रुपयांचा निधी खडकी (बा), ते घारापर येथील रोडचे काम बोगस, सदर काम इस्टिमेट प्रमाणे करण्यात आलेल नसल्याचे तक्रारदाराने स्पष्ट सांगितले आहे, गुणवत्ताहिन रॉमटेरियल प्रमाणे काम अजिबात केले नसून साईट पट्ट्याचे एक मीटर चे काम करणे बंधनकारक असताना पूर्ण रोड पर्यंत कुठेही साधा मुरूम देखील टाकलेला नाही, सदरचे काम करण्यात आलेल्या नवीन रोड चार ते पाच महिने टिकत नाही, एकाच महिन्यात जागोजाग रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे,त्यासाठी औरंगाबादच्या विशेष गुणनियंत्रण पथकामार्फत क्रॉस चेकिंग करून दुसऱ्या मंडळामार्फत तक्रारदारास समक्ष चौकशी करण्यात यावी असे तक्रारदार यांनी निवेदनात नमूद केले संबंधित कंपनी व कंट्रक्शन यांचे नाव कायमचे काळे यादीत टाकून देणारे बिलाची देयके रोखून ठेवावे व देण्यात येऊ नये संबंधित शाखा अभियंता व उपअभियंता यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी त्यांच्यावर रिकव्हरी करण्यात यावी व चौकशी अंतिम त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायमचे निलंबित करण्यात यावे व तसेच त्यांच्या सेवा पुस्तिकेत लाल अक्षराने नोंद करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करीत करीत येत्या 15/07/2021 रोजी सकाळी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे असे तक्रार यांनी निवेदनात म्हटले आहे व याची संपूर्ण जबाबदारी सदरील कंट्रक्शनकंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाची शाखा अभियंता व उपअभियंता यांच्यावर राहील असे सामाजिक कार्यकर्ते राजु गायकवाड, व विकास गाडेकर, यांनी एका निवेदनात म्हटले आहे, मा.अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय नांदेड, मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे
