
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिर येथील शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडल्याच्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने तीव्र निषेध करून झालेल्या अन्याय विरोधात उद्या दि.11 ऑक्टोंबर रोज सोमवारी हिमायतनगर शहरातील संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले. उत्तर प्रदेशातील लखीमपुर घटनेच्या अनषंगाने महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंद संदर्भात हिमायतनगर येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, राष्ट्रवादी शहर उदय देशपांडे, शिवसेना शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार यांनी एक बैठक घेऊन शहरातील पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन देऊन उद्या दि 11 ऑक्टोंबर रोजी लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर बंद चे आव्हान केले आहे त्यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आपण आपले दुकान पूर्णतः बंद ठेऊन ह्या बंद ला सहकार्य करावे असे आवाहन काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी केले आहे.
