
–
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी)
बिलोली कोरोणा महामारीमुळे शासनाला लॉकडाऊन करावे लागले, सर्व नागरिकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला व सर्वांच्या लढ्यामुळे कोरोना महामारी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली, त्यानंतर शासनाने अनलॉकच्या माध्यमातून सर्व काही पूर्वपदावर आणण्यासाठी बाजारपेठ चालू करण्यास सुरुवात केली , आजच्या घडीस सर्व बाजारपेठ चालू असून हजारोंची गर्दी तेथे होत असते, ठिकठिकाणी राजकीय पक्षांच्या सभा,कार्यक्रम चालू असतात तिथे सुद्धा कोरोना नियमावलीना पायदळी तुडवून लाखोंची गर्दी आपणास पहावयास मिळते, परंतु राज्यातील मंदिरे अजूनसुद्धा भक्तांसाठी उघडण्यात आले नसून कोरोनाच्या नावाखाली अश्या प्रकारचा भेदभाव थांबविण्यात आला पाहिजे, नाहीतर जनतेचा जनक्षोभ उसळला जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच राज्यातील सर्व मंदिरे कोरोना नियमावलीना पाळून चालू करावी अशी विनंती बिलोलीचे तहसिलदार यांनादि.18 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले तसेच ८ दिवसात मागणी मान्य न झाल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी विठ्ठल तुकडेकर वि.हिं.प मठमंदिर जिल्हा प्रमुख
महेश ठकरोड मठमंदिर ता.प्रमुख,संजय तोटलवाड कोषअध्यक्ष विहिंप,अविनाश डपोड अ.भा.वि.परिषद ता.मंञी,बालाजी भंडारे, जयकिशन लावलेकर,रविंद्र यादी जण निवेदन देण्यात आले.
