सोनारी येथील टोलनाका बनत आहे अपघातांचे ठिकाण ठेकेदाराकडून धोक्यांची घंटा


दोन दिवसात काम पूर्ण करा नाहीतर परिणाम भोगावे लागतील

मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष …परमेश्वर सुर्यवंशी


प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी


भोकर ते हिमायतनगर येथील राष्ट्रीय महमार्गाचे काम हे मंदगतीने होताना दिसत आहे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महमार्गाचे काम चालू काही काम पूर्ण झाले असून मात्र वाहण वसुली जो टोलनाका सोनारी शिवारामध्ये उभारणी केला जात आहे मात्र त्याचे काम गेल्या एक वर्षापासून तसेच बंद पडल्यामुळे वाहनचालक यांना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात त्या बंद पडलेल्या कामाचा त्रास होताना दिसत आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे याकडे ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था या राष्ट्रीय महामार्गावर केलेली नाही व काही ठिकाणी खोदकाम केलेले दिसुन येते त्यामुळे येणाऱ्या वाहन चालक समोर खोदकाम आहे किंवा नाही याची सुचना देखील त्याठिकाणी लावलेल्या नाहीत जर का हे काम दोन दिवसांत पुर्ण नाही केले किंवा त्याठिकाणी वाहण चालकांना येणारा अडथळा दूर नाही केल्यास मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने ठेकेदारांच्या विरोध जिल्हा अधिकारी यांना निवेदन देवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास भाग पाडु असे अव्हाण मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे