हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद
शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, नगरपंचायतीच्या प्रशासकांचे मात्र साफ दुर्लक्ष, प्रशासकाचा कारभार दिवसेंदिवस येत आहे चव्हाट्यावर,शहरात कोरोना चे गांभीर्य नाही ?

शहरातील परमेश्वर मंदिर कमान ते मुख्य रस्त्यावरील सर्व स्टेट लाईट पोल रात्रीला बंद आहेत त्यामुळे शहरात रात्रीला मोटारसायकल चोरी व घरफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत मागील काही दिवसापूर्वी नगरपंचायतीच्या प्रशासकांनी महावितरण कार्यालयातस जी थकबाकी दिली होती तरीपण हिमायतनगर शहर अंधारातच का ? ह्या बाबी कडे प्रशासकाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे असा सवाल शहरातील नागरिक तहसिलदार यांना विचारत आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी हिमायतनगर येथील नगर पंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नेमणूक करून शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे

मागील काळात नगराध्यक्ष कुणाल राठोड होते तेव्हा शहरातील कुठल्याच नागरिकांना पाण्याची लाई टची, स्वच्छतेचा त्रास सहन करावा लागला नव्हता तेव्हा पण महावितरण कार्यालयाचे थकीत बिल नगरपंचायत कडे होते पण मागील नगराध्यक्ष यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी शहरातील नागरिकांना कधीच अंधाराचा त्रास होऊ दिला नव्हता त्यांच्या काळात त्यांनी शहरात कोरोणा चे रुग्ण सुद्धा वाढू दिले नाहीत वेळीच ह्याची दखल घेऊन त्यांनी शहरात कन्टोनमेंट झोन अशा ठिकाणी जागोजागी बॅरिकेट ची व्यवस्था केली होती व शहरात स्वच्छता ठेवण्याचे काम केले अग्निशामक च्या घंटा गाडीने सर्व शहरभर सॅनिटायझर ची फवारणी सुद्धा त्यांनी केली होती पण आता नगरपंचायत वर प्रशासक नेमण्यात आल्याने शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या मागणीस मान देऊन माननीय नांदेड जिल्हाधिकारी यांनी शहरवासीयांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.