
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
-हिमायतनगर तालुक्यातील नांदेड व किनवट या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या करंजी व सोनारी फाट्याच्या मध्य मधची हि घटना घडली पण आशा वारंवार सतत घटना घडत असल्याने याकडे वन विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत प्रचंड उष्णता असलेल्या भागात पाणी व्यवस्थापन नसल्याने प्राण्याला आपला जीव धोक्यात घालून तहाण भागविण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे त्यामुळे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे
अन्न व पाण्याच्या शोधात आलेल्या कोल्ह्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेला दिसून येत आहे.
ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेली असावी असा या मृत पडलेल्या कोल्ह्याच्या बॉडीवरून प्राथमिक अंदाज सिद्ध होतो .. बऱ्याच तासापासून मृत्युमुखी पडलेल्या कोल्ह्याकडे कोणाचेच का लक्ष गेले नसेल..? अजूनही दुर्गंध अवस्थेत रस्त्यावर मृतपडलेला कोल्हा का दिसतोय ..? अशा घटना या भागात दरवर्षी किती घडत असतील? असे अनेक प्रश्न मनाशी निर्माण होतायत..
अशा घटनेवर निर्बंध आणायचे असेल तर वनविभागाने या कडे लक्ष घालणे खूप गरजेचे आहे अन्यथा जंगलाचे वैभव असलेले वन्यप्राण्याच्या संख्यात नक्कीच घट होत जाईल…
