हिमायतनगर पाणी पुरवठा आराखडा बैठक संपन्न ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार … आमदार माधवराव पाटील जवळगावकर

प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाणी टंचाई हा सतत निर्माण होत असल्याने येणाऱ्या काळात नागरिकांना याचा त्रास होऊ नये त्यांचे योग्य ते नियोजन केले पाहिजे या समस्या वारंवार निर्माण होऊ नये करीता आज हिमायतनगर पंचायत समिती येथे हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा आराखडा तयार करण्यात आला दरवर्षी पेक्षा या वर्षी पाऊस समाधानकारक झालेला असताना ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी राणो राणो फिरावे लागते त्या करीता आपणं यांचे नियोजन करून ज्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त आशा ते अधिकृत केलें तर आपण ज्या डोंगराळ भागात पाणी पुरवठा कशा केला जाईल यांचे नियोजन केले पाहिजे त्या करीता आढावा बैठक बोलवलेली आहे मागच्या काळात ज्या काही पाणी पुरवठा योजना अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी केली पाहिजे व तेथील पाणी पुरवठा खंडित का ती योजना पुर्ण राबविण्यात आली किंवा नाही याची माहिती घेणे आवश्यक आहे सरकारने लाखों रुपये खर्च करून जलशिवार योजना राबविण्यात आली त्याची पुर्ण पणे चौकशी करून संपुर्ण अहवाल माझ्याकडं देण्यात यावेत अनेथा त्यांचे परिणाम काय हे मी सांगण्याची गरज नाही असे वक्तव्य मा.माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपल्या शब्दात केले आहे त्यावेळी उपस्थित
या बैठकीत मंचावर पंचायत समितीच्या सभापती सौ.सुरेखा बापूराव आडे, जि.प. सदस्या ज्योत्सनाताई जोगेंद्र नरवाडे, तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, नायब तहसिलदार तामसकर, गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर, पाणी पुरवठ्याचे अभियंता भोजराज, अभियंता मेकेवाड, माजी कृउबा संचालक रफिक सेठ, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, नाजीम बैंकेचे संचालक गणेश शिंदे, शिवाजी पाटिल वाघीकर, अभियंता रायठक, अभियंता सिद्दीकी, व्यंकटेश दमकोंडवार, बालाजी दमकोंडवार, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बालाजी पोगुलवाड, ग्रामसेवक वडदकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती.