शहरातील शालेय पोषण आहार कामगारांना नक्की न्याय मिळवून देऊ :-माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान , न्याय मिळेपर्यंत महिलांचा लढा सुरूच राहणार.

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद शाळा व इतर दोन खाजगी शाळांवर शालेय पोषण आहार योजना सुरू झाली तेव्हा पासून तेथील विद्यार्थ्यांना खिचडी शिजवून जेवण देण्याचे काम करणाऱ्या शहरातील मदतनीस खिचडी कामगार यांनी दोन्ही शाळा म्हणजे एक जिल्हा परिषद शाळा व दुसरी हुतात्मा
हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद शाळा, हुतात्मा जयवंतराव पाटील शाळा, व राजा भगीरथ माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजऊन जेवण देण्याचे काम करणाऱ्या खिचडी कामगारांना कोरोना महामारी मध्ये अचानक विनाकारण कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले गेले होते त्या विरोधात कामगार महिलांनी गटशिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी सांगून सुद्धा विनंती करून सुद्धा त्यांना कामावर घेतले नाही व शहरातील गरीब कुटुंबातील विधवा,अपंग व दारिद्र्यरेषेखालील या महिलांच्या कुटुंबावर कोरोना महामारी मध्ये अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागला होता त्यामुळे या खिचडी कामगारांना कोरोना. काळातील त्यांचे मानधन व त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे ह्या साठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी सुद्धा माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब व जिल्हा परिषद नांदेड यांना पत्र दिले होते त्यावेळेस आपण त्यांचे मानधन देण्यात येईल असे सांगण्यात आले पण नंतर माहे जून 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत कोणताही निर्णय होऊन येथील खिचडी कामगार महिलांना मानधन देण्यात आले नाही त्यामुळे संतप्त होऊन महिला कामगारांनी 25 जानेवारी 2021 रोजी हिमायतनगर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते त्या उपोषणामध्ये हिमायतनगर शहरातील माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान व शहराचे नगराध्यक्ष कुणाल राठोड ,रफिक शेठ,गट विकास अधिकारी सुदीश मांजरमकर ,गटशिक्षणाधिकारी सुकाळे साहेब, काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड,काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी , गजानन हरडपकर, शालेय पोषण आहार प्रमुख धुसे मॅडम , अरुण पाटील व जाणते सर यांनी मध्यस्थी करून या महिलांना मागील दोन महिन्याचे मानधन देऊन मुख्याध्यापकाच्या सहीनिशी यांना कमी केल्याची लेखी पत्र देऊन हे उपोषण सोडण्यात आले
यावेळी उपस्थित कामगार महिलांनी असे सांगितले की हा आमचा लढा यापुढे पण सुरूच राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही व आम्हाला पूर्वी सारखे कामावर घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत राहू असे उपोषण कर्त्या धूरप्तबाई बकेवाड, साबेराबी, सुमनबाई डांगे ,गंगाबाई यटमवाड,नागाबाई संभाजी, धोंड्याबाई निर्मले,शोभा रेनलेवाड, रेनुबाई ,अनिता दंडेवाड,संजू यटमवाड सह आदींनी यावेळी सांगितले