
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यात मौजे करंजी येथिल भुमी पुत्र सारंग मिराशे याची हिमायतनगर संभाजी ब्रिगेड अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सुभाष कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली निवड होताच संपुर्ण तालुक्यातील चाहत्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली सारंग भाऊ यांचे कार्य सतत लोकांच्या मदतीला धावणारे आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणुन तालुक्यात चर्चेत आहेत जनतेच्या सुख दुःख सदैव तत्पर राहुन त्यांना मदत करणे असे मोलाचे योगदान ते देत असतात आजुन त्यामध्ये नवीन भर पडली आणि तालुक्यातील युवकांना वेगळे मार्गदर्शक लाभेल असे दिसून येवू लागले त्यामुळे सर्व स्तरातुन त्याच स्वागत केले जात आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
