
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर| दि. 12 तालुक्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या करंजी ग्रामपंचायत निवडणुकीत 7जागेसाठी मतदान झाले त्या सात जागा पैकी सहा जागा सामाजिक एकता ग्रामविकास पॅनलच्या बाजुने निवडुन आल्या.
त्यानंतर आज झालेल्या सरपंच निवडीत वनिता बालाजी पुट्ठेवाड सरपंचपदी व उपसरपंच लताबाई पांडुरंग सूर्यवंशी यांचे नामनिर्देशक पत्र दाखल केल्याने सरपंचपदी वनिता बालाजी पुट्ठेवाड तर उपसरपंचपदी लताबाई पांडुरंग सूर्यवंशी यांची बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी शेख सय्यद यांनी निवड झाल्याचे जाहीर केले.
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दि.१८ सोमवारी जाहीर झाला होतं, त्यानंतर आरक्षण निवडीसाठी पदाची निवड रखडली होती. अखेर तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडी तीन टप्प्यात होणार असल्याने आज झालेल्या निवडीमध्ये करंजी येथील सरपंच पदाची निवड निवडणूक अधिकारी तथा शेख सय्यद साहेब यांच्या उपस्थितीत झाली. सरपंच-उपसरपंचाची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंच पदी वनिता पुट्ठेवाड , उपसरपंच-लताबाई सूर्यवंशी ,
सदस्य- अरुण मारोती गाडेकर , आश्विनी निरंजन जाधव ,
रामकिसन विठ्ठल सुंकरवार ,शबीर महेबूब पठाण, व इतर एक सदस्यांचा समावेश आहे.
यावेळी ग्रामसेवक ए पी सावंत , पोलीस पाटील बापूराव मिराशे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक नासर पठाण,गजाननराव सूर्यवंशी,पांडुरंग सूर्यवंशी, आत्माराम जाधव, मारोती गाडेकर, राघो गाडेकर, नारायण सूर्यवंशी, दिगंबर कोनप्रतवार,शमू पटेल, बाळू जाधव, तुकाराम शिंदे, साहेबराव सूर्यवंशी,भाऊराव प्रभणकर,निरंजन जाधव, केशव सोळंके, विकास गाडेकर भागोराव मिराशे राजु मुगळकर माधव गाडेकर, सुभाष माने, परमेश्वर सूर्यवंशी, कृष्णा माने, गणेश जाधव, इत्यादी उपस्थित होते.या निवडीने नवयुवकांना संधी मिळालीआहे गावाच्या विकासासाठी सर्व जण एकत्र येऊन कार्य करावे असे आवाहन सर्व सदस्य यांनी शपथ घेतली आहे
