
.
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी)
हिमायतनगर तालुक्यातील वन विभाग बनते शेतकऱ्यांची डोकेदुखी मोकाट प्राण्यवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात काविळ चरत असताना दिसून येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते याकडे लक्ष देण्याची गरज आहे आज संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहता नांदेडच्या ठिकाणी राहुन येथिल कारभार बघत असताना दिसून आले आहे नाही काविळीचे बंदोबस्त व त्यांवर कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली जात नाही त्यामुळे पिकांचे लाखों रुपये नुकसानभरपाई कोण देणार अशी चर्चा शेतकऱ्यां मध्ये होताना दिसते दुसरीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले जवळपास २५ टक्के नुकसान झाले पुन्हा काविळ पिकांमध्ये फिरत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेआणि आता पाउस सतत पडत असल्याने नुकसान शेतकऱ्यांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे वनपरिक्षेत्र अधिकारी मात्र घरी राहून लाखों रुपये पगार खातो आणि एकीकडे प्राणी लाखो रुपये शेतकऱ्यांचे नुकसान करीत असतो याला जबाबदार कोण शासन कि शेतकरी आज प्राण्याची व्यवस्था जंगलात होत नसल्याने तो आपली भुक भागविण्यासाठी राणोराण भटकंती करीत असतो हिमायतनगर तालुक्यातील वाळके वाडी दुधड सोनारी जवळगाव शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो नाही कर्मचारी येते नाही कोणता अधिकारी जर का येत्या काही दिवसांत खुल्या प्राण्याचा बंदोबस्त नाही केला तर शेतकरी आपला मोर्चा वनविभाग कार्यालयावर काडतील अशा इशारा एका सामान्य शेतकऱ्यांनी आम्हच्या पत्रकारांशी बोलताना दिला आहे
चौकट
वनविभाग अधिकारी यांचा हलगर्जिपणा
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची दखल घेणार कोण?
जंगल तोड होत असल्याने प्राणी जंगलाच्या बाहेर
