
हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व कृषि कायाद्या निषेधार्थ आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार यांच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष संजय माने यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदला काँग्रेस कमिटी हिमायतनगर तर्फे तहसीलदार यांना निवेदन देवून पाठींबा देण्यात आला आहे त्याच बरोबर सतत पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस हातचे गेले असुन त्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात यावेत व तात्काळ स्वरुपात मदत करण्यात आली पाहिजे असे आदेश काढण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले एकीकडे केंद्र सरकारने कमी केलेल्या सोयाबीनच्या किंमती त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे पेरणीच्या वेळी दहा हजार रुपये प्रमाणे बॅगा विकत घेऊन पेरणी केली दरवर्षी पेक्षा या हंगामात सोयाबीन चा पेरा जास्त झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या बॅगेचा खर्च आजच्या किमतीत निघतो का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला त्याचे कारण केंद्र सरकार आहे असे व्यकतव्य त्यांनी केले आहे कृषि कायदा हा शेतकरी विरोधी कायदा आहे या कायद्यामुळे शेतकरी बांधला जावू शकतो तो त्यांचा माल तो त्यांचा मर्जी नुसार विकु शकत नाही म्हणून त्या बदल करून सुधारीत कायदा अंमलात आणला पाहिजे यासाठी आज नायब तहसीलदार तामसकर यांना हिमायतनगर काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर शहर अध्यक्ष संजय माने मा. संचालक ना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अल्ला राठोड असे अखिल अहमद माजी नगराध्यक्ष मार्केट कमिटी सभापती प्रकाश वानखेडे रफीक सेट मा बाजार कमिटी संचालक रामराव पाटील सुर्यवंशी सुभाष शिंदे गोविंद आप्पा बंडेवार पंडीत ढोणे तुकाराम माने आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
