
सोशल डिस्टन्स मध्ये स्विकार केला जाईल अर्ज निवडणूक आयोगाचे निर्देश.
परमेश्वर सुर्यवंशी …प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील जवळपास ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असुन दिनांक २३डिसेबर ते ३०डिसेबर चा कालावधी निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असताना त्या मध्ये काही मध्येतरी सुट्या असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ करताना दिसुन आले आहे आज जवळपास ५२ग्रामपचायत पैकी करंजी सोनारी वाघी विरसोनी इतर काही गावातील ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर काही ग्रामपंचायत बिनविरोध विरोध होण्याच्या मार्गावर आहेत बिनविरोध झाल्या तर निवडणूक आयोगाचे वज्ज कमी होईल व लागणारी प्रशासन यंत्रणांची बचत होईल आज हिमायतनगर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने उत्तम असे नियोजन केले व सोशल डिस्टन्स मध्ये अर्ज दाखल केले हिमायतनगर तालूक्याचे कर्तृत्वान तहसीलदार गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे व काही ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज उद्याला दाखल होतील असे चित्र निर्माण झाले आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी बिना मास्क व सॅनिटाझर वापरलेल्या शिवाय कोणाला ही आत प्रवेश दिला गेला नाही याची व्यवस्था केलेली दिसुन आले आहे
